न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२२) :- भारत सरकार तसेच राज्य शासनाने “ सरोगसी (नियमन) कायदा २०२१” व “सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा २०२१” दि.०४ मे २०२२ व दि. १३ जून २०२२ पासून लागू करण्यासाठी अधिसूचना निर्गमित केली आहे.
या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी, वैद्यकीय विभाग यांच्या वतीने महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ञ, खाजगी टेस्ट ट्यूब बेबी (IVF) सेवा देणारे केंद्रधारक, सरोगसी सेवा देणारे केंद्र धारक तसेच इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (NIMA) यासारख्या संस्थांचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा मंगळवारी (दि. ३०) दुपारी.३.०० वाजता चाणक्य सभागृह, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी येथे केले आहे.
या कार्यशाळेमध्ये संबंधीतांना “ सरोगसी (नियमन) कायदा २०२१” व “सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा २०२१” या कायद्याबाबतची माहिती व अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.















