न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- चिंचवडगावातील मोरया हॉस्पीटलच्या मागील बाजूस आज मंगळवारी (दि. ३०) सकाळी ६ च्या दरम्यान सुतळी बॉम्बसारखे फटाके फुटत असल्याचा आवाज आला.
त्यामुळे परिसरात राहणारे चिंचवडचे पोलीस नागरिक मित्र राकेश सायकर घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना ट्रान्सफॉर्मरच्या केबलला आग लागून आगीचे स्पार्क उडत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच अग्निशमन विभागाला कळवले. अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग विझवली.
ट्रान्सफॉर्मरच्या केबलला किरकोळ आग लागली होती. आग विझविण्यासाठी काही वेळ परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, असे अग्निशामक विभागाने सांगितले.















