न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- पुणे-लोणावळा रेल्वेत आपलं कर्तव्य बजावत असताना रविवारी पुण्याहून लोणावळ्यात रेल्वे दाखल झाली. एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जात असताना वाटेत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ”बाजूला हो पुढे जायचं आहे”, असे टीसीने म्हटले.
त्याचा राग आल्याने मुलाने टीसीच्या डोळ्यावर बुक्क्यांचा मारा केला. टीसीच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. गणेश जाधव असे जखमी टीसीचे नाव आहे. त्यांनी आरोपीला पकडून ठेवत प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.















