- चॅलेंजर पब्लिक स्कुल आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटेंचा पुढाकार..
- धकाधकीच्या जीवनात आरोग्य शिबिरांचे आयोजन फायदेशीर – अनिताताई संदीप काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुल आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांच्या वतीने तुषार रेसिडेंसी सोसायटीत मेगा हेल्थ चेकअप या आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, तसेच हिमोग्लोबिन इत्यादी आजारांवर विविध प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. रोगनिदान झालेल्या नागरिकांना डॉक्टरांनी पुढील उपचारांचा सल्ला दिला आहे. शिबिरात जवळपास पाचशे नागरिक सहभागी झाले होते.
मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी चॅलेंजर पब्लिक स्कुलच्या उपाध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदिप काटे, युवा नेते निलेश काटे, उद्योजक संदीप काटे, चेअरमन नितीन कोंडालकर, अनिता तुतारे, वैद्यकीय पथक, सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक व सभासद उपस्थित होते.
अनिताताई काटे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. यामुळे जीवनात रोगराईचे वाढते प्रमाण व आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी वेळोवेळी आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच आजारांचे निदान होऊन त्यावर योग्य औषधोपचार करणे शक्य होते. आपल्या रोजच्या आहाराचे नियोजन, आवश्यक आरोग्य चाचण्या व नियमित व्यायाम या गोष्टींचे मानवी जीवनातील महत्त्व वाढत असून प्रत्येकाला आपले आरोग्य सदृढ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन नागरिकांसाठी फायदेशीर आहे.















