- बेस्ट सेलिब्रेटी डेंटिस्ट म्हणून लंडन पार्लमेंटचे सिनेट सदस्य ऑलिव्हर बॉलहॅचेट यांच्या हस्ते गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- ग्रॅव्हिटोन इंटरनॅशनल आणि ब्रिटिश पार्लमेंट लंडन यांच्या अंतर्गत “ऑस्कर इन डेन्टिस्ट्री” हा सोहळा नुकताच भारतामध्ये संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी पुणे, नवी सांगवी येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांना बेस्ट सेलिब्रेटी डेंटिस्ट म्हणून या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दर वर्षी हा सोहळा लंडन पार्लमेंट येथे होतो. हा पुरस्कार देताना ब्रिटिश डेप्युटी हायकमिशन व लंडन पार्लिमेंटचे सिनेट सदस्य ऑलिव्हर बॉलहॅचेट यांनी डॉ. आदित्य पतकराव यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.आदित्य यांनी ऑलिव्हर बॉलहॅचेट यांना व्हिजनरी डेंटिस्ट हे मॅगझीन दिले. या सोहळ्यास ब्रिटिश डेप्युटी मेअर डॉ. चारुलता देवेंद्रने, तामिळनाडूचे शिक्षणमंत्री थिरु आंबील महेश पय्यमोझी आणि यांच्यासह अनेक आयएएस व आयपीएस अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यापूर्वीही डॉ. आदित्य यांना अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांना दुबई येथील रॉयल पॅलेस येथे आलं झरुनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.तसेच डॉ. आदित्य पतकराव यांची सर्वाधिक कर देणारे डेंटिस्ट म्हणून वर्ल्ड बुक ऑफ लंडन येथे नोंद झालेली आहे. डॉ. आदित्य यांचे नवी सांगवी येथे अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डेंटल हॉस्पिटल आहे. जे लाखो रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने रुग्णसेवा पुरवित आहे.















