- अद्याप चार हजारांपेक्षा अधिक दिव्यांग सर्वेक्षणापासून वंचित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ८ हजार ६० एवढे दिव्यांग असून त्यातील केवळ ३ हजार ७०० दिव्यांग व्यक्तींनी आपले सर्वेक्षण करून घेतले आहे. त्यामुळे उर्वरीत दिव्यांगानी ३० सप्टेंबर २०२२ च्या आत सर्वेक्षण करावे अन्यथा त्यांचा लाभ बंद करण्यात येईल, असे अवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीचे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र नोंदणी व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी हे सर्वेक्षण महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात केले जाते. या सर्वेक्षणासाठी महापालिकेने वेळोवेळी जाहिरात, पत्रके, फ्लेक्स, सोशल मिडीद्वारे जनजागृती केली आहे. तसेच १० मे १५ जून २०२२ या कालावधीत विशेष शिबीर ही आयोजीत केले होते.
तरीही ८ हजार ६० पैकी केवळ ३ हजार ७०० दिव्यांगानीच आपले सर्वेक्षण करून वैश्विक ओळखपत्र तयार करून घेतले. त्यामुळे उर्वरीत दिव्यांगानी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन ३० सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण करून घ्यावे अन्यथा त्यांचा लाभ बंद करण्यात येईल असे आवाहान महापालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाचे सहायक आयुक्त श्रीनीवास दांगट यांच्या वतीने करण्यात आले आहे.















