न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२२) :- बनावट चावीच्या सहाय्याने अज्ञात चोरट्याने कपाट उघडले. कपाटातून एक लाख ९६ हजार रुपये किमतीचे ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
हा प्रकार १५ ते ३० ऑगस्ट या दरम्यान पिंपरीत घडला. महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















