न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२२) :- एसआरए सर्व्हे करण्यास विरोध केला. त्या कारणावरून आरोपी हा तलवार घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला. त्याने हातातील तलवार नाचवून परिसरात दहशत निर्माण केली. त्यावेळी आरोपीच्या हातातील तलवारीमुळे फिर्यादीच्या वहिनीच्या दंडास खरचटले. तसेच आरोपीने लोखंडी पाईप हातात घेऊन फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली.
अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी खंडेवस्ती, एमआयडीसी भोसरी येथे घडला. गणेश दशरथ भोले (वय ३५, रा. खंडेवस्ती भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पवित्रसिंग भोंड, शक्तीसिंग भोंड, चार महिला आणि शक्तीसिंग भोंड याचे वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पवित्र सिंग आणि शक्ती सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















