न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- डेंग्यू , मलेरिया या आजारांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरांची आणि इतर ठिकाणांची तपासणी केली. या तपासणीमध्ये १ हजार ६३ डास उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली आहेत. त्यानुसार संबंधितांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच १८ जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
हौसिंग सोसायट्यांबरोबरच घरातही कुंड्यातून, तसेच रुग्णालये, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत आहेत.
शहरात डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या हाउसिंग सोसायटी, भंगार दुकाने, टायर दुकाने अशा आस्थापनांना १ जून ते २२ ऑगस्ट या कालावधीत १ हजार ६३ आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत. यापैकी १८ आस्थापना धारकांकडून ५८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये घर १ हजार, व्यावसायिक आस्थापना २ हजार, तर मॉल, हॉस्पिटल, बांधकाम असलेल्या इमारती यांना १० हजारांचा दंड आकारण्यात येतोय.


















