न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- बोपखले गावालगत मुळा नदीच्या परिसरात एका व्यक्तीने झाडाला गळफास घेतला. बोपखेल गावातील रामनगर भागातील काही मुले बुधवारी सकाळी मुळा नदी परिसरात गेले. त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत व्यक्ती आढळून आला.
मुलांनी याबाबत रामनगर येथील काही नागरिकांना माहिती दिली. त्यानुसार नागरिकांनी ११२ क्रमांकावरून पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी दुपारी बाराच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. बापू श्रीरंग शिंदे (वय ५६, रा. रामनगर, बोपखेल), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. बुधवारी (दि. ३१) रोजी ही घटना उघडकीस आली.















