न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ फेब्रु.) :- पार्थ पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे आज मंगळवार (दि. १९) रोजी शरद पवार यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत अजित पवार, पार्थ किंवा रोहित कोणीही लढणार नाही. केवळ मी आणि सुप्रिया ही निवडणूक लढवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबीयांची जनरेशन नेक्स्ट असणारे पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची प्रचंड चर्चा होती. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती.
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.











