न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- कुदळवाडी मनपा शाळा क्रमांक ८९ येथे स्वी सदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकारातुन शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संपत पोटघन, रामकृष्ण लांडगे, कुंडलीक मोरे, विजय तापकीर, शरद गोरे, प्रकाश चौधरी, यश जाधव, करण पाखरे, स्वराज पिंजण, स्वप्निल पोटघन हे उपस्थित होते.
स्वी. सदस्य दिनेश यादव म्हणाले, ज्ञानातून माणसाची सर्वाधिक प्रगती होत असते. ज्याप्रमाणे एखाद्या मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, पण त्यांना समृद्ध करण्यात शिक्षकांचा वाटा अत्यंत मोलाचा ठरतो.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संपत पोटघन म्हणाले, भारतीय संस्कृतीने गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा असे म्हटले आहे. शिक्षकांप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहिले पाहिजे, असे मला नेहमी वाटते. तसेच यावर्षी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शिक्षक दिनाला एक वेगळा आनंद प्राप्त झाला आहे.
मारूती खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.















