- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती; अमित गोरखे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- मॉस्को, रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो आॕल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने भारत-रशिया संबधाच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने एक पाउल पुढे टाकले आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे. या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण रशियात १४ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक केंद्रात करण्याचे योजिले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री नारायणस्वामी व महाराष्ट्रातील शंभरपेक्षा जास्त अण्णाभाऊंच्या विचाराने प्रेरित सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.















