न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार उद्या गुरूवारी (दि. ८) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय.
अजितदादा गुरूवारी दुपारी काळेवाडीत येणार असून, तिथून त्यांचा भेटीगाठींचा दौरा सुरु होणार आहे. तो रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. एकाच दिवशी ते शहरातील ३० मोठ्या गणेश मंडळांना भेटी देणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.
गणेश मंडळांच्या आरतीसह उत्सवातील इतर कार्यक्रमांनाही ते हजेरी लावणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे, अशीही माहिती मिळतेय.


















