न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २० फेब्रु.) :- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. १४) रोजी पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या घटनेचा उद्योजक संतोष बारणे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

तसेच मोशी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित त्यांना नमन करून, पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोशी ग्रामस्थ, सिल्व्हर ग्रुपचे पदाधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.











