न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, (दि. 5 जून 2026) :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने इंद्रायणीनगर, सेक्टर क्रमांक १, भोसरी येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “झाडे लावा, झाडे जगवा” हा केवळ नारा न राहता काळाची गरज बनली असून पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच मानवी जीवनात वृक्षांचे असलेले योगदान, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
भाजप युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष जयदीप कांतीलाल करपे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी जयदीप करपे, शौर्य करपे, राजेश चौधरी, बबन वाडेकर, दादाभाऊ वाकचौरे, शंकर मेमाणे, पंढरीनाथ घोडके, प्रसाद देशमुख, प्रशांत देशपांडे, प्रवीण माने, बालाजी खाडे, अविनाश वाघ, राजेंद्र मुंजाळ, गोरक्ष काळे (योगशिक्षक), दादाभाऊ पाटील (योगशिक्षक), किसन म्हसे, रामदासजी जैद (डायरेक्टर, आर.आर. पॅकेजिंग सोल्युशन), राजेंद्र खोसे, मल्हारी काळे, ढगे मावशी तसेच भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि गार्डन ग्रुप, इंद्रायणीनगरचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरात वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.














