न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रु.) :- जी. के. एन. सिंटर मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड पिंपरी येथील कंपनीमध्ये शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आली. कंपनीचे एम. डी. डॉ उज्जल भट्टाचारजी व महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. विशेष बाब म्हणजे संपूर्ण औद्योगिक परिसरात ही पहिलीच कंपनी आहे जिथे शिवाजी महाराजांची मूर्ती मंदिरात बसविलेली आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत तात्यासाहेब शितोळे उपस्थित होते. या प्रसंगी कंपनीचे एम. डी. डॉ. उज्जल भट्टाचारजी, मनीष सातपुते उप महाव्यवस्थापक सप्लाय चैन मॅनेजमेंट, महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे व उपाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी कंपनीचे प्लांट डायरेक्टर संबीत प्रहराज, उप महाव्यवस्थापक प्रॉडक्शन दीपक जाधव, व्यवस्थापक मानव संसाधन व औद्योगिक संबंध महेश वैद्य, तुषार कदम, सुरक्षा अधिकारी श्रीकृष्ण खडसे तसेच संघटनेचे सेक्रेटरी के. के. लातूरवाला, कोषाध्यक्ष अनिल भुजबळ, दीपक गौड, प्रशांत चौगुले उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश वाघेरे, अमोल मुलगे, गणेश लांडगे, हरीश चक्रायत, प्रवीण जाधव, तेजस काकडे यांनी प्रयत्न केले. निलेश शिनलकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी कामगार व अधिकारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.











