न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रु.) :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. ही युती जनतेच्या तसेच शेतकरी बांधवाच्या प्रश्नांवर आवाज उठवुन, त्यांना न्याय मिळवुन देण्याकरीता सकारात्मक चर्चा करून केलेली आहे. या गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला तसेच भाजपा व शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांना आनंद झालेला आहे.
इतिहासात नोंद आहे की, छत्रपती शिवाजी महाराज किंवा हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील त्यांच्या पाठीवर जवळच्या सहकाऱ्यांनीच वार केलेले आहेत. सांडलेल्या रक्ताची किंमत मोजुन, त्यांनी जनतेच्या हितासाठी संघटन पुढे नेले. त्यामुळे शिवसेनेची ही माघार नाही किंबहुना लाचारी देखील नाही. तडजोड तर नाहीच नाही. शिवसेनेची तलवार दुधारी आहे. आई तुळजाभवानी मातेची आहे. न्याय सत्यासाठी तळपणारी आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मनसे नेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादी प्रवक्ता नवाब मलिक आपण याकडे दुलक्ष करू नका. आपल्या लायकीत राहा. तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार म्यान नाही.
सामान्य जनतेसाठी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाविषयी अपशब्द न थांबवल्यास, शिवसेना स्टाईलने दणका दिला जाईल, असा इशारा शिवसेना संपर्कप्रमुख तिरोडा-गोरेगाव विधानसभा तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे.











