न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- जीवनसाथी मेट्रोमोनीयल साईटद्वारे आरोपीने फिर्यादींसोबत मे महिन्यात ओळख केली. तो स्वतः मोठा व्यावसायिक असल्याचे भासवून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादींसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन देऊन त्याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादींसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून व्यवसायात गरज असल्याचे सांगत फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून १२ लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यातील दोन लाख ७५ हजार रुपये परत करून उर्वरित १० लाख रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.
ही घटना मे ते ६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडी येथे घडली. पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावेद शफी काझी (वय ३४, रा. फोंडा, गोवा), महिला (वय ५५), शशीधर कुमार (वय २६) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
















