न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- दरवाजाला कुलूप लावून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय गणपती विसर्जन मिरवणुकीत गेले होते. तेथून परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
कपाटातील सामान जमिनीवर विस्कटलेले होते. कपाटातील पत्राच्या पेटीतील १३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले. हा प्रकार पिंपरीतील साई चौक येथे घडला. अजय मक्खनलाल बजाज (रा. साई चौक, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
















