न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रु.) :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) सध्या आर्थिक अडचणीत सापडली असून, कंपनीकडून वसुली मोहिमेसाठी टोकाची पाऊले उचलली जात आहेत. थकीत वीजबिल ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
त्यामुळे इतर ग्राहकांबरोबरच महावितरणाच्या बीएसएनएल या ग्राहकाच्या चिंचवड येथील टॉवरची वीजसेवाही बंद करण्यात आली आहे. महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेला वीजमीटर काढून टाकण्यात आला आहे.
त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांनाही गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला बीएसएनएल इंटरनेट सेवा पुरविते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आयुक्तालयाची इंटरनेट सेवा बंद पडली आहे.











