न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून, महापालिकेत फिरणाऱ्या तोतया कर्मचाऱ्याला सुरक्षारक्षकांनी पकडले आहे. त्याच्या संशयास्पद हालचालीने मागेही या तोतया कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी पकडले होते. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून दिले होते.
या तोतया कर्मचाऱ्याचे संदेश रामचंद्र जाधव असे नाव असून, त्याने महापालिकेच्या मजूर पदाचे बनावट ओळखपत्र तयार करुन, महापालिकेत शिरकाव केला होता.
त्याचा सुरक्षारक्षकांना सशंय आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली असता, तो तोतया असल्याचे सिद्ध झाले. सुरक्षा विभाग प्रमुख उदय जरांडे यांनी या तोतया कर्मचाऱ्यास पिंपरी पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्याच्यावर तक्रार दाखल केली आहे.











