न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- सेल्समनचे काम करीत असताना दुकानातील कामगारांची नजर चुकवून हातचलाखी करून दुकानातील एकूण १७.०३ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
हा प्रकार १३ सप्टेंबरला दुपारी १२.१५ ते २.३० वाजता नवी सांगवी येथील सोनिगरा गोल्ड एल. एल. पी (एस. जे. पी. एल. सोनीग्रा ज्वेलर्स) येथे घडला. कैलास यादव वारे (वय ४७, मॅनेजर, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. मंजुनाथ बिराजदार, (सध्या रा. पिंपळे गुरव) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















