न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- बँकेने ओढून आणलेली गाडी लिलावामध्ये कमी किमतीत मिळवून देतो, असे आश्वासन आरोपीने फिर्यादी यांना दिले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी तीन लाख ५० हजार ५०० रुपये घेतले. पैसे घेऊन गाडी न देता आर्थिक फसवणूक केली.
ही घटना २४ एप्रिल ते १३ सप्टेंबर या दरम्यान वाकड येथे घडली. संदीप अंगद गणगे (वय ३३, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल जैन (वय ३० वर्षे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.















