न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर हे जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध असतातच. परंतु, प्रसिध्दीसाठी विनाकारण शिवसेना पक्षावर टिका कदापी सहन केली जाणार नाही. माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यावेळी भापकर यांनी शिवसेनेवर मुक्तीफळे उधळली आहेत. याचा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी कडव्या शब्दात प्रतिकार केला आहे.
दाखले यांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून, यात त्यांनी म्हटले आहे की, मारूती भापकर हे निडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठीच फक्त शिवसेना पक्षात आले होते. त्यांनी याअगोदर स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी विविध राजकिय पक्षामध्ये कोलांटी उड्या मारलेल्या आहेत. हे सर्वसामान्य जनतेला व राजकिय जाणकारांना चांगलेच ठाऊक आहे.
स्वाभिमानशुन्य, लबाड, लाचार, या शब्दांचा उपयोग हे आपल्या लेखनितुन किंवा मुखातुन बोलु शकत नाहीत. उगाचच प्रसिध्दीसाठी शिवसेना पक्षाशी संबध नसताना, टिका करण्याचा अधिकार भापकरांना नाही. कारण त्यांनी विविध समाजोपयोगी आंदोलने करत असताना स्वतःच्या नावापुढे कधीही शिवसैनिक हा शब्द लावलेला नाही. त्यामुळे शिवसेनेवरील टिका कदापीही वंदनिय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक व शिवशाही व्यापारीसंघ सहन करणार नाही, असे दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.











