न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. आगामी लोकसभा निवडणूक व त्या पाठोपाठ येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाला अतिरीक्त कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासते.
जिल्हा प्रशासनाला ६५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसह प्राधिकरणाला निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचारी पूर्तता करण्यासंदर्भात मागणी केली आहे.
प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासकीय) आशाराणी पाटील यांनी प्राधिकरणाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची यादी काढली आहे. त्यानुसार प्राधिकरणाची सुमारे ७७ जणांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.











