न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २१ फेब्रु.) :- ‘या ठिकाणी रहायचे नाही. रहायचे असेल, तर माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवावे लागलीत, माझे ऐकावे लागेल, अन्यथा तुम्हाला लाईट, पाणी, रस्ता मिळू देणार नाही’. तसेच जातीवाचक शब्दप्रयोग केल्याची घटना चिखलीतील पाटीलनगर परिसरात घडली आहे.
दत्तात्रय मोरे आणि मनोज मोरे (रा. चिखली) असे या इसमांची नावे आहेत. पीडित ३२ वर्षीय महिलेने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी या दोन्ही इसमांवर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा केला आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.











