न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- चिखली येथील नुर-ए-इमान सोशल तहेरीक (निस्ट) च्या वतीने रुग्णाना फळे वाटप करून, शिवजयंती साजरी करण्यात आली. श्री. छञपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त चिखली परीसरातील हाॅस्पीटल मधील ४० रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
नुर ए इमान सोशल तहेरीकचे अध्यक्ष फिरोज शेख, डॉ मोमीन शेख, डॉ श्रेयस सातपुते, हबीब शिकलगार, नुरुद्दीन मौलवी, मुश्ताक मोमीन आदि उपस्थित होते.











