न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्यांचा मेळावा होणार आहे. सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर या ठिकाणी चर्चा होणार असून त्या सोडवण्याचे प्रयत्न पवारांच्या माध्यमातून केले जाणार आहेत.
थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात ५ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता हा मेळावा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अजित गव्हाणे म्हणाले की, शहरातील विविध सोसायटीधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.


















