न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- क्रिप्टो करन्सीत गुंतवणुक करून ५२ तासामध्ये दोन ते तीनपट परतावा परत देणार, असे सांगुन फिर्यादीकडुन क्रिप्टो करन्सीच्या स्वरूपात फिर्यादीच्या खात्यातुन स्वतःच्या खात्यात १४,८३,०००/- रूपयांचे क्रिप्टो करन्सी घेतल्या.
फिर्यादी यांना कोणताही परतावा व घेतलेले क्रिप्टो करन्सी परत न देता फिर्यादी यांची फसवणुक केली आहे. ही घटना दि. १६/०२/२०२१ ते आज रोजीपर्यंत ए ३०२, विशालनगरी, दिघी येथे घडली.
निलेश ज्ञानदेव वराडे, (वय ३५ वर्षे, रा. ए ३०२, विशालनगरी, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी कुणाल सुरेश पोटले (वय २२ वर्षे, रा. ११२, बिबवेवाडी ओटा, दत्त मंदीर, बिबवेवाडी रोड, बिबवेवाडी, सध्याचा पत्ता रा. पहीला मजला, अनुसया निवास, नालंदा सोसायटीजवळ, मयुर स्वीटसजवळ, भारत ज्योती बस स्टॉप) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.