न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- विनापरवाना लावलेले बॅनर काढत असताना आरोपींनी वाद घातला. महिला सुरक्षा रक्षकाला हाताचा मारून सरकारी कलमात अडथळा निर्माण केला.
हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) रोजी सकाळी ११. ३० च्या सुमारास दापोडीतील नरवीर तानाजी पुतळया जवळ, रेल्वेगेटच्या बाजुला घडला. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सिंकदर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), नंदु ऊर्फे बाबा कांबळे, गोपाळ मोरे, व इतर दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















