न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- मागील ३ वर्षाच्या यशस्वी नियोजनानंतर २०१९ पर्व ४ ‘IBC Premier cricket League’ चे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते मदनलाल धिंग्रा ग्राऊंड येथे टाॅस करुन, सकाळी ९ वा. उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेवक अमित गावडे, वसंत ग्रुपचे अनिल मित्तल, IBC चे नितेश मकवाना, अभय खिवसंरा, दिलीप मॅथ्यू, कैलास पारेख व सर्व टिम सदस्य उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, ‘IBC Premier Cricket League’ च्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले असून, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना खेळांची अत्यंत गरज असते. खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. यावेळी स्थानिक नगरसेवक अमित गावडे, वसंत ग्रुपचे अनिल मित्तल, IBC चे नितेश मकवाना, अभय खिवसंरा, दिलीप मॅथ्यू, कैलास पारेख व सर्व टिम सदस्य उपस्थित होते.
ही लिग २३ आणी २४ फेब्रुवारी दोन दिवस चालणार असून, त्यामध्ये एकूण ८ संघ सहभागी आहेत. सर्व मॅच ८ ओव्हरच्या होणार आहेत, बक्षीस समारंभ २४ फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.