न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २३ फेब्रु.) :- मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलचे ‘वार्षिक स्नेह संमेलन २०१९’ शुक्रवार (दि. २२) रोजी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील मुलांनी ‘स्री सबलीकरण’ या विषयावर नाट्य व विविध नृत्यप्रकार उपस्थितांसमोर सादर केले. शाळेतील मुलांनी या स्नेह संमेलनात हिरारीने सहभाग नोंदवला. मुलांच्या पालकांनी सभागृह हाउसफुल झाले होते.
कार्यक्रमास लष्करी अधिकारी पी. व्ही. गोरे, आर. जी. कदम, जे. जे. सिंग, डी. एच. कुलकर्णी, सुनील रंधवे, अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेत्या राजश्री घागरे, शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धन्न, शाळेतील शिक्षक, पालक व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.











