- गाडी आणि मुळ कागदपत्रे घेवुन आरोपी पसार; चिंचवडमधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- ओएलक्सवर फिर्यादीने त्यांची इटींगा गाडी क्र. एम. एच. १४ एच. जी ९२२६ ही विकण्यासाठी जाहीरात दिली होती. ही जाहीरात पाहून आरोपीने फिर्यादीशी बोलुन गाडीचा ११,२०,००० रुपयांना व्यवहार ठरवला.
आरोपीने २,७०,००० रुपये फिर्यादीच्या अकाउंटला पाठवले. उरलेले पैसे फिर्यादीच्या गाडीवरील लोनचे हप्ते आरोपी भरणार होता, असा विश्वास फिर्यादीला दिला. फिर्यादीने आरोपीसोबत लेखी नोटरी केली. फिर्यादीची गाडी व गाडीचे मुळ कागदपत्रे घेवुन आरोपीने बँकेचे हप्ते न भरता व उरलेली रक्कम व गाडी परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणुक केली. हा प्रकार (दि.२६/१०/२०२०) पासुन ते आजपर्यंत नक्षत्रम हॉटेलसमोर, वाल्हेकरवाडी येथे घडला.
विठठल आप्पासाहेब व्हनमाने (वय ३२ वर्ष, रा जय गुरुदत्त हौसिंग सोसायटी, रविकिरण बिल्डींग, चिंचवडेनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अझहर मणियार व असीम अमीन कादरी (दोघेही रा. द्वारका, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.