न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २३ फेब्रु.) :- समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांनी पोलीस आयुक्त आर. के पद्मनाभन यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील महादेव पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार करत असतांना दगडी सभामंडप कोसळून ३ मजूरांचा मृत्यू व काही मजूर गंभीर जखमी झालेले आहेत. महापालिकेकडून गतवर्षी १६ नोव्हेंबर रोजी अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती.
मात्र, याकडे शहर अभियंता राजन पाटील व अंबादास चव्हाण यांनी दुर्लक्ष करुन कारवाईस टाळाटाळ केली. यामुळेच हा अपघात झाला आहे. त्यामुळे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, असे कुरेशी यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर सालारभाई शेख, रवी यादव, मुक्तार पठाण, वाहिदा शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.











