- शहर शिवसैनिकांकडून मशाल चिन्ह मिळाल्याने फटाके फोडत स्वागत..
- आकुर्डी शिवसेना भवनसमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२२) :- निवडणूक आयोगाने बाजारबुडव्यांच्या बाजुने ज्या पध्दतीने डाव आखला, त्याचा पुरता हिशोब घेण्यासाठी धगधगती मशाल हाती घेतली आहे. आता गद्दारांच्या छाताडावर पाय देऊन बुडाखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही. मुंबई अंधेरी पोटनिवडणुकीत धडाकेबाज विजय पटकावून ही मशाल अखंड तेवत ठेवण्यासाठी सामुदायीक लढा उभा करण्याचा निश्चय करुयात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शिवसेना प्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले. अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले. पिंपरी-चिंचवड शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकुर्डीतील शिवसेना भवनसमोर मशाली पेटवून मशाल निशाणीचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले. यावेळी अॅड. सचिन भोसले, शहर संघटिका अॅड. उर्मीला काळभोर, पिंपरी-चिंचवड निवडणूक शहर समन्वयक वैभव वाघ, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, वैशाली मराठे, योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुखअनंत कोराळे,शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, सुधाकर नलावडे, गुलाब गरूड, राम पात्रे, विजय साने, दिलीप भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, संदीप भालके, नितीन बोंडे, महेश कलाल, संतोष वाळके, अमोल निकम, अमित निंबाळकर, मोहन बारटक्के, गणेश आहेर, सुरज बाबर, नितीन दर्शिले, रावसाहेब थोरात, सुदर्शन देसले, दत्ताराम साळवी, पार्थ गुरव, सागर शिंदे, विजय दर्शिले, श्रीकांत चौधरी, गोरख नवघने, शरद जगदाळे, विकास भिसे, महादेव औसरमल, राजेंद्र पालांडे, गणेश झिळे, अनिता तुतारे, गौरी घंटे, कामिनी मिश्रा, वैशाली कुलथे, वैभवी घोडके, शिल्पा अनपान, तस्लीमा शेख, सुषमा बोरकर, रुपा दौडमौनी, विद्या सुर्वे, कमल गोडांबे, हर्षाली घरटे आदींनी मशाल चिन्हाचे जल्लोषात स्वागत केले.
उर्मीला काळभोर म्हणाल्या, आता उठवू सारे रान… आता पेटवू सारे रान… या साने गुरुजींच्या कवितेतील वाक्याप्रमाणे तमात शिवसैनिक खवळून उठला आहे. आता हातात पेटती मशाल घेऊन ईडी सरकारचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही. ईडी सरकारच्या दबावाखाली येऊन निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाची निशाणी गोठवून मशाल हाती दिली आहे. तीच पेटती मशाल हाती घेऊन संबंध महाराष्ट्राचा स्वाभीमान चेतवण्याचे काम पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करायचे आहे. हाती मशाल घेऊन संबंध महाराष्ट्राची दिशाभूल करणा-या खोके सरकारमधील गद्दारांना नामोनिशान केल्याशिवाय राहणार नाही.















