न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२२) :- सोल अॅग्रो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातुन फिर्यादी, सहकारी महिला, दत्ता मोतीराम कुराडे (रा. देहुगाव) व महिला यांना आरोपींनी प्लॅन ए व बी मधुन मोठया प्रमाणात भांडवल जमा करुन त्यामधुन फिश फार्मींगचा प्रोजेक्ट उभारुन कंपनी मोठया प्रमाणात नफा कमवणार आहे, असे आमिष दाखविले. त्यामध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन प्लॅन ए व बी प्रमाणे मोठा परतावा देण्याचे खोटे आमिश दाखवले.
फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना एकुण ५७ लाख ७० हजार रुपये गुंतवणुक करण्यास भाग पडले. आरोपींनी ठरवल्याप्रमाणे विश्वास बसेपर्यंत सुरवातीचे काही महिने त्यांना थोडया प्रमाणात परतावा दिला. त्यापुढे प्लॅन ए व बी प्रमाणे कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा गुंतवणक केलेली मुद्दल परत न करता फिर्यादी व त्यांच्या सहका-यांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणुक केली आहे. तसेच पैशांची मागणी केल्यावर भांडणे करण्याची धमकी देवून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०३/१२/२०२० ते अद्यापपर्यंत आरोपी यांचे ऑफिस व राधाकृष्ण हॉटेल, शिवार गार्डन, पिंपळे सौदागर येथे घडला. फिर्यादी नितीन ज्ञानदेव कांबळे (वय ४४ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०२, तुलसी एकलव्य सोसायटी, भोसलेनगर हडपसर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी शकिल अब्बास शेख, सोल अॅग्रो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीचे मालक अब्दुल शकिल शेख (रा. राजुरी, ता. जुन्नर, पुणे), पुतण्या शहानवाज दाऊद शेख यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहे.















