न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२२) :- वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील काळेवाडी, रहाटणी रस्त्यावरील निल अमृततुल्याच्या समोरील रस्त्यावर आरोपी विक्रीच्या उद्देशाने अमली पदार्थ जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून १८,००० रुपये किंमतीचा मोबाईल, २०,३८५ रुपये किंमतीचा १ किलो ३५९ ग्रॅम इतका डुडा अफु वनस्पतीच्या सुकवलेल्या बोडांचा चुरा (पॉपि स्ट्रॉ) हा अंमली पदार्थ, तसेच ७६,००० रुपये किंमतीचा आफिम व ६५,००० रु ची ग्रे रंगाची अॅक्टीवा गाडी असा एकुण १,७९,३८५ रुपये किंमतीचा माल जप्त केला. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने डुडा अफु वनस्पतीच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा (पॉपि स्ट्रॉ) व आफिम हा अंमली पदार्थ हनुमान बिष्णोई (रा. धानोरी, पुणे) याच्याकडुन आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी वाकड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी नरेश बाबुराम बिष्णोई (वय २१ वर्षे, रा. काळेवाडी फाट्याजवळ, गणपती कारखान्याजवळ, काळेवाडी, मुळ रा. शणीवाडा ता. राणीवाडा जि. जालौर, राज्य राजस्थान) आणि आरोपी हनुमान बिष्णोई (रा. धानोरी पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.















