- माथाडी कामगाराकडे खंडणीची मागणी; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- मंत्रा प्रॉपर्टी येथे माल घेवुन आलेला ट्रेलर माथाडी कामगार मंडळाच्या नियमाप्रमाणे खाली करीत असताना फिर्यादीच्या तोंड ओळखीचा व्यक्ती अश्वीन अगरवाल व त्याच्यासोबत रवी व इतर दोन व्यक्तींनी गाडी खाली करण्यावरुन फिर्यादीशी वाद घातला. सोमनाथ फुगे यांच्या सांगण्यावरून मालाचा ट्रेलर खाली केला, असे फिर्यादीने त्यांना सांगितले. त्यानंतर रात्री ८.०० च्या सुमारास आरोपी तिथे आला. मला अश्वीन शेठने पाठविले आहे, असे फिर्यादीला आरोपी म्हणाला.
” तुम्हाला सकाळी अश्वीनशेठने सांगुन देखील तुम्ही येथे गाडी खाली केली, हा आमचा एरीया आहे, आता मला गाडीची हमाली द्या व पुन्हा या भागात दिसायचे नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही ”, असे म्हणत फिर्यादीला दमदाटी केली. ” जर तुम्हाला या ठिकाणी काम करायचे असेल तर आज गाडी खाली केलेली रक्कम आत्ताच्या आत्ता माझ्याकडे द्यायची व दर महिण्याला आम्हाला १०,०००/- रु चा हप्ता द्यावा लागेल, जर तुम्ही आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या एरीयात काम करु देणार नाही”, असे धमकावत फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.
हा प्रकार (दि. १०) रोजी आठच्या सुमारास मंत्रा प्रॉपर्टीज, खंडोबा माळ, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात विष्णु हनुमान हांडे (वय २५ वर्षे, रा. रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अश्वीन अगरवाल (वय अंदाजे ४० वर्षे, १२६/२, छाया बिल्डींग, मोहननगर चिंचवड), रवि शरद महाराणा (वय अं. ३५ वर्षे, रा. दत्तनगर, महापुरेचाळ, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















