- संघटनेकडून नूतन पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- चाकण MIDC उद्योजक संघटनेने म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व व पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. चाकण MIDC परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील? याबाबत सविस्तर चर्चा केली.
चाकण MIDC उद्योजक संघटना परिसरात राबवीत असणाऱ्या सामाजिक उपक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपूर्वी स्वखर्चाने चालू केलेल्या संघटनेच्या नाईट पेट्रोलिंगबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळातही चाकण MIDC उद्योजक संघटना पोलीस प्रशासनाल सर्वोत्परी मदत करील, असे आश्वासन चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी दिले.
याप्रसंगी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, सचिव निवास माने, संचालक प्रवीण शिंदे, संचालक किसन गायकवाड, उद्योजक विजय मानकरे, उद्योजक आप्पासाहेब सूर्यवंशी, उद्योजक किरण जाधव, उद्योजक बसवराज होण्णाळे, MTE कंपनीचे देशमुख, सिद्धकला इंडस्ट्रीजचे गोळे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.















