न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या बोऱ्हाडेवाडी व च-होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना ९० टक्के स्वहिस्सा भरणा करण्याकरिता वाढीव मुदत देण्यात आली आहे. ही वाढीव मुदत दि. ३१/१०/२०२२ अखेरपर्यंत आहे. दिलेल्या मुदतीत स्वहिस्सा भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिक दुर्बल घटकांसाठी दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी रावेत येथे ९३४, बोऱ्हाडेवाडी येथे १२८८, च-होली येथे १४४२ असे एकुण ३६६४ लाभार्थ्यांची संगणक सोडतीद्वारे विजेता यादी जाहीर केली होती.
प्रकल्पातील निवड झालेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी पुर्ण झालेली असुन, निवड झालेल्या लाभार्थ्यांना महापलिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशान्वये स्वहिस्सा भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतीत स्वहिस्सा न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात येईल.















