न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- ” मी तुझ्याशी लग्न करणार आहे ”, असे म्हणत फिर्यादी तरुणीला आरोपीने विश्वासात घेतले. परंतु, लग्न न करता फिर्यादी तरुणीशी वेळोवेळी तिच्या ईच्छेविरुध्द शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
हा प्रकार दि. १६/०१/२०२२ ते ०४/०७/२०२२ कसीनो लॉज, निगडी येथे घडला. याप्रकरणी पिडीत २८ वर्षीय तरुणीने निगडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपी निरजकुमार बिजलेश शुक्ला (वय २५ वर्षे, रा. केअर ऑफ हेमंत केदारी, राजश्री कॉलनी, बी.न. ३, वडगाव शेरी, पुणे, मुळ रा. राणीपूर, पो. दामपुर, ता. खागा, जि. फतेपूर) याला ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















