- माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची वाहतूक विभागाकडे मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- चिखलीतील कुदळवाडी परिसरातील मोरे पाटील चौकात वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सांयकाळच्या सुमारास वाहनांच्या संख्येने चौकात मोठी गर्दी होते.
या गर्दीतून पायी जाणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांच्या किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे येथील चौकात कायमचा वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे तळवडे-चिखली वाहतूक पोलीस विभागाकडे केली आहे.
















