न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असुनही आरोपीने फिर्यादी मुलीशी लग्न केले. वेळोवेळी फिर्यादी पिडीत मुलीशी शारीरीक संबंध निर्माण करुन तिला गरोदर केले.
अल्पवयात एका मुलाला जन्म दिला. हा प्रकार दि. १५/०८/२०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत मुरुकुटे कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी व गांधिनगर, खराळवाडी, पिंपरी येथे घडला. याप्रकरणी पिडीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी आशिष दिलीप मोरे (वय २० वर्ष, रा. मुरुकुटे कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्यावर बालविवाह प्रतिबंधक २००६ च्या कलमांतर्गत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















