न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- दिवाळीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यामुळे विक्रेते मोठ्या संख्येने या व्यवसायाला पसंती देतात. मात्र, फटाक्यांच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. यासाठी पोलीस, अग्निशामक विभागाच्या परवानगीसह विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. परवाना नसताना फटाके विक्री केली तर विक्रेत्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांकडून अशा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही. ई-कॉमर्स वेबसाईट, फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी संकेतस्थळावर ऑनलाइन फटाके विक्री करता येणार नाही महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. न्यायालय, केंद्र व राज्य सरकार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे फटाके विक्री संदर्भातील आदेश पाळणे बंधन बंधनकारक राहील.
महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार फटाका विक्रेत्यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित अग्निशामक विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी. जेणेकरून सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात हवा प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे फक्त ग्रीन फटाके विक्रीसाठी ठेवावे, अग्निरोधक उपकरणे लावावी. न्यायालय, केंद्र व राज्य सरकार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे फटाके विक्री संदर्भातील आदेश पाळणे बंधनकारक राहील. शहरातील गर्दीच्या व गजबजलेल्या मार्गावर, दाट वस्तीच्या भागात फटाके परवाने मंजूर केले जाणार नाहीत. त्यामुळे या भागातील परवान्यासाठी अर्ज करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विक्री परवान्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज. जागेचे ना हरकत प्रमाणपत्र. आजूबाजूच्या रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र. जागेच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे. स्थळदर्शक नकाशा. अग्निशामक अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र. ही घ्यावी काळजी. फटाक्यांची दुकाने समोरासमोर नसावी. फटाका विक्रीच्या ठिकाणी तेलाचा दिवा, खुला विद्युत दिवा वापरू नये. दुकानाच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करू नये. दुकानात ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. लाकडी रैंक, कापडी शामियानाचा वापर करू नये. १८ वर्षांखालील मुलांना फटाके विक्री करू नये या अटी आणि शर्थी आहेत.
















