न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- पार्किंगमध्ये फिर्यादीने ९०,००० रु. किमतीची बुलेट मोटार सायकल (एम एच १४ एच सी १६६४) हॅण्डेल लॉक लावून पार्क केली होती. ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे.
ही घटना १३/१०/२०२२ रोजी नऊ वाजत ते १४/१०/२०२२ रोजी ९.१४ च्या सुमारास टुलिप होम्स सोसायटी, फलॅट नंबर ३०८, चाकण ते शिक्रापुर रोड मेदनकरवाडी, खेड येथे घडली.
अजीत जयभारत उमरीकर (वय ३६ वर्षे रा. फलॅट नंबर ३०८ ए विंग टुलिप होम्स सोसायटी चाकण ते शिक्रापुर रोड मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















