- जनावराचे २ टन मांसाचे तुकडे आणि तीन लाखांची पिक अप जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- मळकटलेल्या ताडपत्रीच्या खाली झाकुन ठेवलेले मोठया जनावराचे मांसाचे तुकडे व त्याचे अवयव दिसुन आले. ते मांस विक्रीसाठी कोठेतरी घेवून जात असल्याचे फिर्यादीला समजले.
अंदाजे २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे मोठ्या जनावराचे २ टन मांसाचे तुकडे, तीन लाखांची पिक अप (गाडी नं. एम.एच. १४ एच.जी ६६९४) असा एकुण ५ लाख ४० हजार रूपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
हा प्रकार (दि. १५) रोजी साडेपाचच्या सुमारास पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर उर्से टोलनाक्याच्या पुढे मुंबई लेन वडस्टॉक फुडमॉल, ओझार्डे गावानजीक घडला. फिर्यादी आशीष कमलाकांत बारीक (वय २५, रा. ए-९ सुर्योदय वेलफेअर सोसा, अशोकनगर, घाटकोपर, वेस्ट मुंबई) यांनी शिरगांव-परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गाडीवरील (एम.एच १४ एच.जी ६६९४) चालक आरोपी मेहबुब शमशोददीन मैदरगीकर (वय ४५ वर्षे, रा. रमाबाईनगर रावेत याला अटक केली आहे.