न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- कंपनीत काम करीत असताना आरोपी कंपनीमध्ये दारु पिऊन आला. लाईट व मशीन बंद करु लागला. त्यावेळी ‘ तु आता दारु पिलेला आहेस तु आता घरी जा व सकाळी ये ‘ असे फिर्यादीने आरोपीला सांगितले. आरोपीने त्यांचे काहीएक म्हणणे ऐकुण न घेता फिर्यादी काम करीत असलेले मशीन बंद करू लागला.
त्यास फिर्यादीने अडवले असता वाईट शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली. आरोपीने हातात काहीतरी घेवुन फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. ही घटना (दि. १४) सांयकाळी साडेसात वाजता लक्ष्मण इंजीनीअरींग, पवारवस्ती, रस्ता क्रमांक ७, कुदळवाडी चिखली येथे घडली.
फिर्यादी संतोषकुमार तेजनारायण राउत (वय २२ वर्ष, रा. गुप्ता बिल्डीग, रुम नंबर माहीत नाही, पवारवस्ती चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी राम करण यादव (वय व पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहे.