- बाबा कांबळे हेच आपले नेते; इचलकरंजी, कोल्हापूर रिक्षा संघटनांच्या मेळाव्यात रिक्षा चालकांचे एकमत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- देशव्यापी रिक्षा टॅक्सी फेडरेशनच्या जबाबदारीसह महाराष्ट्रातील कृती समिती एक संघ ठेवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. डॉ बाबा आढाव व स्वर्गय शरद राव यांनी महाराष्ट्र मध्ये कृती समिती स्थापन करून त्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र केल्या परंतु काही स्वार्थी प्रवृत्तीच्या पूढार्यांमुळे कृती समितीमध्ये फूट पडली, स्वार्थी प्रवृत्तीला बाजूला सारून महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र करणे, व दिल्ली येथील देशव्यापी जवाबदारी सांभाळणे अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागत आहे. या सर्व भूमिका मी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने पूर्ण करेल. परंतु आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे. इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिक्षा चालक-मालक संघटनांनी खूप प्रेम दिले. इचलकरंजीतिल माणसे खूप प्रेमळ अभ्यासू आणि जिवाभावाची आहेत. कल्याणकारी महामंडळ इतर प्रश्नवर शेवटचा दे धक्का आरपारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुंबईच्या दिशेने मंत्रालय वरती कुच करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ऑटो रिक्षा, टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी इचलकरंजी, कोल्हापूर येथील मेळावा मध्ये व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लियाकत गोलंदाज उपस्थित होते. या वेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गफारभाई नदाफ, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष गजानन खापे, फिरोज भाई मुल्ला राजाराम पाटील एम.डी. कलाईगार, प्रवीण झळके, शाम टिकारे, रमेश बागळे, कुणाल चौगुले, बल्लूर स्वामी, शिवाजी हुपिरे, दीपक जोतवार, आदी उपस्थित होते.
या वेळी जीवन कोळी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षे आपण रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी कल्याणकारी मंडळाचा लढा देत आहोत. परंतु गेले 25 वर्ष आपला प्रश्न का सुटत नाही. आपन नेता निवडल्याशिवाय आणि नेत्याच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. आता आपल्याला बाहेरच्यांची गरज नाही. आता आपल्यातला नेता निर्माण झाला आहे. बाबा कांबळे हेच आता आपले नेते आहेत. बाबांचा १९९७ सालचा रिक्षासमोरील उभा असलेला फोटो महाराष्ट्रा व देशभरात व्हायरल झाला, ते रिक्षा चालक आहेत, यामुळे रिक्षा चालकांचे सुखदुःख त्यांचे प्रश्न त्यांना चांगले माहित आहेत, रातराणी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष ते भारत देशाचे ऑटो टॅक्सी फेडरेशन अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे, आता बाबाच आपले नेते असे जीवन कोळी म्हणाले.
रामचंद्र जाधव म्हणाले आतापर्यंत आपण अशा लोकांच नेतृत्व मानलं ज्यांनी कधीही आयुष्यात रिक्षा चालवली नाही ज्यांना रिक्षाचा कुठलाही अनुभव नाही, यामुळे त्या नेत्यांना रिक्षा प्रश्नाचे जाण नसल्यामुळे त्यांना आपल्या सुखदुःख कळालं नाही, यामुळेच आपले प्रश्न सुटले नाही, आता एक रिक्षा चालक नेता झाला आहे आपल्यातील नेतृत्व पुढे आला आहे आता बाबा कांबळे हेच आपले नेते आहेत असे ते म्हणाले,
आपले अध्यक्ष भाषणामध्ये मुलाखत लियाकत गोलंदाज यांनी बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली यापुढे महाराष्ट्राचा देशभरामध्ये एकत्र येण्याचा ठराव या सभेत इचलकरंजी येथील सर्व रिक्षा संघटनेने एकमताने मंजूर केला. महाराष्ट्रातील देशातील सर्व रिक्षा चालक व संघटनांना देखील आव्हान केले आहे की त्यांनी हे नेतृत्व मान्य करून, आपले प्रश्न सोडण्यासाठी एकजुटीने काम करावे,
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी- इचलकरंजीचे विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मन्सूर सावनुरकर, छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा मंडळाचे अध्यक्ष कयुम जमादार,अल्ताफ शेख, शाहीर जावळे, खालील हीप्पर्गी,रामचंद्र कचरे, राजाराम माळगे, सुधाकर घोलांडे, राम कांबळे, सुनील गायकवाड, दौलत भोरे, अमोल अपराध, शब्बीर लोकापुरे, अशोक नांद्रे, राजू आवळे, मुन्नाभाई चौधरी, समीर नादनीवाले, दिलावर सावनुरकर, मोहम्मद मुल्ला, खाजा चौधरी, यासीन चौधरी, गौस लोकापुरे, खाजाहुसेन मुजावर, भोसले मामा, आदिनाथ आळंदी, आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी यांनी परिश्रम घेतले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुरभाई नायकवडे यांनी केले प्रस्तावना शिवजी साळुंखे, आभार प्रदर्शन अनिल बम्मनावर सामजिक कार्यकर्ते यांनी केले.


















