- कंपनीच्या कुकवर पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- ठाणे येथील टाटा कंपनीत २००३ साली फिर्यादी महिलेचे पती नोकरीला होते. कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये राहत असताना कंपनीने घरकामासाठी कुकची व्यवस्था केली होती. त्यानंतर आरोपी कुकने २०२० साली अचानक फिर्यादीला मो. ९३२६४५२५२६ वरुन फोन केला. घरातील लोकांची विचारपुस करून फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादीस अधुनमधुन कॉल करुन चौकशी केली.
२०२१ साली आरोपी वांरवार फिर्यादी महिलेस फोन करु लागला. फिर्यादीने त्याला माझ्याशी बोलु नको व फोन करु नको असे सांगत त्याचा नंबर ब्लॉक केला. आरोपीने फिर्यादीच्या पतीच्या फोनवर मॅसेज केला, “तु माझ्याशी फोनव्दारे बोलली नाही तर मी तुझी बदनामी करीन ” अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार फोन करुन बदनामी करण्याची धमकी देत फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २०२१ पासुन आजपर्यंत गोविंद दर्शन सोसायटी, प्लॅट नं ५०१. इस्कॉन मंदिराजवळ, रावेत येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी किशोर मोहंती (वय ४५ वर्षे, रा. मुंबई, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रावेत पोलीस पुढील तपास करीत आहेत.